बिग बी’ ने केले सर्वाना मंत्रमुग्ध

शांतिच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मैगास्टार अमिताभ बच्चनने ‘रंग दे बसंती’ हे गाणे म्हणुन सर्वानाच मंत्रमुग्ध केले. मुबईच्या अंधेरी स्पोटर्स कॉम्पलैक्समध्ये आयोजित कार्यक्रमात ‘ग्लोबल साऊंड्स ऑफ पीस’ मध्ये बच्चनने संगीत निर्देशक आदेश श्रीवास्तव सोबत हे गाणे गायले.

यावेळी बोलताना बच्चन म्हणाले, ‘ अशा स्वरूपाच्या वेगळ्या कार्यक्रमात सहभागी होता आले याचा मला आनंद वाटतो. खुप दिवसपासून या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती ती या निमिताने पूर्ण झाली आहे. सिनेसृष्टीशी संबंधित कार्यक्रमात वेगळा माहौल असतो. त्यठिकाणी वेगळे संगीत ऐकण्यास मिळते. या कार्यक्रमास असलेली गर्दी पाहुन मला माहित नव्हते की, संगीत एवढ्या जणांना आवडत असेल. हे संगीत थोडेसे क्लासिकल असल्याने सर्वाना आवडले असेल.’

या कार्यक्रमात ‘बिग बी’ शिवाय सिनेसृष्टीशी संबंधित असलेले गायक उदित नारायण, सिनेनिर्माता आर. बाल्की आणि आशुतोष गोवारिकर त्याशिवाय अभिनेता आयुष्मान खुराना, कुणाल कपूर आदिजन सहभागी झाले होते.