महिनाभरापूर्वीच म्हणजे १६ डिसेंबर रोजी बॉलीवुड अभिनेत्री आणि ‘डर्टी गर्ल’ विद्या बालन आणि यूटीवीचे प्रमुख सिद्धार्थ रॉय कपूर यांचे लग्न झाले आहे. नवविवाहिता असलेल्या विद्याने डब्बू रतनानीच्या कैलेंडरसाठी काही हॉट फोटोशूट केले आहेत. या कैलेंडरमध्ये ती टॉपलेस दिसत असल्याने याची चर्चा आता जोरात रंगली आहे.
लग्नानंतर विद्याचे हॉट फोटोशूट
रतनानीच्या या कैलेंडरमध्ये विद्या केवळ कोट घालून दिसणार आहे. याबाबत बोलताना विद्या म्हणाली, ‘ मी जरी लग्न केले असले तरी याचा माझ्या बॉलीवुडमधील कामावर काहीच परिणाम होऊ देणार नाही. आगामी काळात मी ‘घनचक्कर’ या सिनेमात इमरान हाशमी सोबत काम करीत आहे. या सिनामच्या शूटमध्ये मी सध्या व्यस्त आहे. हा सिनेमा विनोदी असल्याने माझ्यासाठी थोडासा हटके असा अनुभव असणार आहे.’
तसे पहिले तर गेल्या काही दिवसात आलेले ‘इश्किया’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ या दोन सिनेमातील विद्याचा रोल एक बोल्ड अभिनेत्रीचा राहिला आहे. त्याशिवाय या सिनेमाच्या माध्यमातून तिला पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे तिने येत्या काळात बोल्ड सिनेमात काम करण्याचे ठरविले आहे असे दिसते.