अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने इंडस्ट्रीमध्ये जरी पिता शत्रुघ्न सिन्हा यांच्या पावलावर पाऊल ठेवले असले तरी इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी तिला वडिलाची मदत झाली नाही असे ती म्हणते. सलमान खानच्या ऑपज़िट ‘दबंग’ या सिनेमातून आपल्या करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री सोनाक्षी तिच्या यशाबाबत मात्र कॉन्फिडेंट आहे.
यशासाठी मेहनतच लागते-सोनाक्षी
इंडस्ट्रीमध्ये तिला केवळ शॉटगनची मुलगी म्हणून यश मिळाले आहे का ? असे विचारले असता सोनाक्षी म्हणाली, ‘ तसे जर रहिले असते तर माझा भाऊ कधीच इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झाला असता. स्टारकिड्स असल्याने इंडस्ट्रीमध्ये एंट्री लवकर मिळते. त्याठिकाणी टिकून राहणे मात्र अवघड असते. हे सर्व काही तुमच्या मेहनतीवर डिपेंड असते. माझे काम चांगले होते, बोलणे चांगले होते मेहनत केल्याने मी यशस्वी होऊ शकले. अन्यथा एका सिनेमानंतर मी इंडस्ट्री बाहेर गेले असते. याचे मोठे उदाहरण माझ्या घरात आहे. काही दिवसापूर्वी माझ्या भावाने इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले होते. मात्र त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे याठिकाणी फक्त तुमचा परफॉरमेंस बघितला जातो. त्यामागे कोण आहे हे बघितले जात नाही.’
सोनाक्षीने तिची ‘बहन जी’ या इमेजच्या बाहेर येउन ‘हिम्मतवाला’ या सिनेमात एक आयटम सॉन्ग केले आहे. मात्र या इमेजला ती पॉजिटिव असे मानते. सध्या ती तिच्या रोलवर खुश असून काही घालून घेतलेली बंधने तोडणार नसल्यचे तिने यावेळी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसापासून भाऊ होम प्रॉडक्शनचे काम पाहत आहे. लवकरच त्या माध्यमातून नवीन प्रॉजेक्ट सुरु करण्याचा प्लान आहे. ‘