
दक्षिण चीनमध्ये एक महाप्रचंड आकाराची नाविन्यपूर्ण इमारत उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आपला पूर्वीचा मध्ये भोक असलेला ढब्बू पैसा होता त्याच आकारात ही इमारत आहे. चीनी वास्तशास्त्र फेंगशुई प्रमाणे भरभराट, पैसा, प्रसिद्धी आणि लक या गोष्टींचा लाभ व्हावा या उद्देशाने या विशिष्ठ आकारात ही इमारत बांधली गेली आहे. या शास्त्राप्रमाणे पाणी पैसा आणतो तसेच मध्ये भोक असलेले ब्राँझचे नाणे, ओल्ड जेड, वॉटरव्हिल गुड फॉर्च्युन आणतात. त्यानुसार पर्ल नदीकाठी उभारलेली ही इमारत ब्राँझच्या नाण्याच्या आकारात बांधली गेली आहे. ३३ मजले असलेल्या या इमारतीची उंची आहे ४५३ फूट आणि त्यासाठी खर्च आला आहे १ अब्ज युआन.
