ऑस्ट्रेलिया संघाची आज घोषणा

फेबुवारी महिन्यात भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा गुरुवारी करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आगामी काळात भारताविरुद्ध चार कसोटी सामने खेळणार आहे. त्यासाठी संघाची घोषणा गुरुवारी पर्थ येथे निवड समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकसून देण्यात आली.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघा दरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होणार आहे. हे चार सामने अनुक्रमे चेन्नई, हैदराबाद, मोहाली, नवी दिल्ली येथे होतील.

या मालिकेला २२ फेब्रुवारीपासून चेन्नई येथील कसोटीने प्रारंभ होईल. अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनला भारत दौर्‍यासाठी संघात संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतातील संथ खेळपट्ट्या पाहता या ठिकाणी ऑस्ट्रेलिया संघाची कस लागणार आहे. तसे पाहता या ठिकाणी नुकत्याच झालेल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यामुळे हा ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतीय संघाच्या दृष्टीने सत्वपरिक्षा पाहणारा आहे.

Leave a Comment