
ब्लॅकबेरीने दीर्घ काळच्या प्रतीक्षेनंतर नवीन ब्लॅकबेरी १० ऑपरेटिंग सिस्टीमसह झेड १० व क्यू १० हे दोन नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. कंपनीचे सीइ्रओ थॉस्टन हेन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने त्यांचे जुने आरआयएम नाव आता बाद केले असून जगभरात सर्वत्र आता ब्लॅकबेरी याच नावाने त्यांची उत्पादने ओळखली जाणार आहेत. ब्लॅकबेरी याच ब्रँड नेमने ही उत्पादने विकली जातील. त्याचबरोबर कंपनीने ट्रेडिग लोगोही बदलला असून स्टॉक एक्स्चेंजवर तो बीबीआरवाय असा ओळखला जाईल.