आता हरभजनसिंग, ज्वाला झळकणार सिनेमात

टीम इंडियाचे काही खेळाडू क्रिकेट सोबतच रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. त्यामध्ये आता नव्याने फिरकीपटू हरभजनसिंगची भर पडत आहे. लवकरच तो रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यासोबतच स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आता लवकरच तेलगू चित्रपटात झळकणार आहे.

याबाबत हरभजन म्हणाला, ‘ इंडस्टजमधील अनेक स्टार अभिनेते व पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधील काही जनासोबत चित्रपट तयार करण्याविषयी चर्चा करत आहेत. दोन चित्रपटांसाठी मी दोन सहदिग्दर्शकांचीदेखील निवड केली आहे. विनोदी व रोमँटिक असे दोन चित्रपट मी बनवत आहे. माझ्या मते, चित्रपट क्षेत्रात पैसा आहे. यासाठी मी पंजाबी चित्रपटांत नशीब अजमावण्याचा विचार करत आहे.’

तर दुसरीकडे स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आता लवकरच तेलगू चित्रपटात झळकणार आहे. गालानथायिंडेच्या एका गाण्यात ती नृत्य करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरणदेखील सुरू झाले आहे. याबाबत ज्वाला म्हणाली, ‘ पहिल्या दिवशी शूटिंगच्या वेळी मी फार नाराज होते. सेटवर अनेकजन होते. या वेळचा अनुभव फार वेगळा होता. मला डान्सच्या स्टेप शिकण्यासाठी तब्बल आठवडा लागला.’

Leave a Comment