प्रियंकाला नाही गोविंदासाठी वेळ

आगामी काळात येत असलेला ‘ दीवाना मैं दीवाना’ हा गोविंदा आणि प्रियंका चोप्राचा सिनेमा सहा वर्षापासून तयार झाला आहे. मात्र आतापर्यंत हा सिनेमा रिलीज झालेला नाही. आता हा सिनेमा १ फेबुवारी २०१३ रोजी रिलीज होत आहे. दिग्दर्शक केसी बोकाड़िया यांच्या या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात गोविंदा सध्या बीजी आहे मात्र गेल्या काही दिवसापासून वेळ नसल्याने प्रियंका चोप्रा मात्र गैरहजर आहे.

याबाबतीत गोविंदाला विचारले असता तो म्हणाला, ‘ या सिनेमाची निर्मिती करीत असताना बोकाड़ियाने माझ्याकडे प्रियंकाच्या बाबतीत विचारण केली होती. त्यावेळी मीच तिची शिफारस केली होती. त्यावेळी मीच प्रियंका एकेदिवशी टॉपची स्टार होईल असे तिला सांगितले होते. ती एक गिनी अभिनेत्री असून तिने अभिनयाच्या जोरावर वेगळे नाव कमविले आहे.’

आगामी काळात येत असलेल्या ‘दीवाना में दीवाना’ या सिनेमात गोविंदा नेगेटिव शेडची भूमिका करीत आहे. एके काळी गोविंदा उशिरा सिनेमाच्या सेटवर जात होता त्यावेळी त्याचे सिनेमे हिट होत होते. मात्र आता काळ बदलला असून तो वेळेवर पोचत आहे मात्र सिनेमे चालत नाहीत. त्याचा हा ‘दीवाना मैं दीवाना’ हा सिनेमा एक फेबुवरीला रिलीज होत आहे.

Leave a Comment