पहिले पैसे मग काम – शर्लिन चोप्रा

सेक्सी अदाकारा शर्लिन चोप्राने आगाऊ पैसे मिळाले नसल्याने सिनेमात काम करण्यास नकार दर्शविला आहे. पूर्वीपासून काही ना काही विवादात अडकलेली अभिनेत्री शर्लिन हिने सिने निर्माता अनिल शर्मा यांच्या ‘स्टार एक अनाम’ या सिनेमात आयटम सॉंग करण्यास नकार दर्शविला आहे. या सिनेमात अभिनेता सनी देओलची मुख्य भूमिका आहे. या सिनेमात शर्लिन एक आयटम सॉंग करणार होती.

शर्मा यांनी तिला वेळेवर पैसे दिले नाहीत या कारणामुळेच गेल्या काही दिवसापासून शर्लिनने आयटम सॉंगची रिहर्सल करण्यासही नकार दर्शविला आहे. शर्लिनने रिहर्सल करण्यास नकार दर्शविल्याने या आयटम सॉंगचे काम रखडले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शर्लिनने पैशाच्या समस्यामुळे सिनेमाच सोडला आहे. या सिनेमाचे निर्माता अनील शर्मा गेल्या काही दिवसापासून शर्लिनला वगळण्याचा विचार करीत आहेत. या मागील निश्चित कारण मात्र समजत नाही. कारण काहीही असो एक मात्र नक्की आहे की, शर्लिन चोप्राने जर हा सिनेमा सोडला तर सिनेमाचे मोठे नुकसान होणार आहे.

Leave a Comment