आता लक्ष मिशन वर्ल्ड कपवर

इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत ३-२ ने धूळ चारल्यानंतर ‘टीम इंडिया’सह कर्णधार धोनीचा आत्मविश्‍वास काहीसा आता दुणावला आहे. पराभवाच्या छायेतून बाहेर निघाल्यानंतर आता त्याने दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या मिशन वर्ल्ड कपवर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आतापासूनच त्यांनी २०१५च्या वर्ल्ड कपची तयारी सुरु केली आहे.

‘टीम इंडिया’ला दोन वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आगामी २०१५च्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी अष्टपैलू इरफान पठाण हवा आहे. इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत धूळ चारल्यानंतर ‘टीम इंडिया’ने दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या मिशन वर्ल्ड कपची तयारी चलू केली आहे. त्यासाठी आतापासूनच विविध पातळीवर तयारी ही सुरु केली आहे.

याबाबत बोलताना कर्णधार धोनी म्हणाला, ‘टीम इंडिया’ला आगामी काळात चांगल्या अष्टपैलू क्रिकेटपटूची गरज आहे. ही उणीव सध्या संघात असलेले रविद्र जाडेजा, रविचंद्रन अश्‍विन व भुवनेश्‍वर कुमार भरून काढू शकतात, मात्र मला भेदक गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू हवा आहे. अटीतटीच्या निर्णायक क्षणी सातव्या व आठव्या क्रमांकावरील फलंदाजाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. इरफान पठाण ही भूमिका पेलवू शकतो.’

Leave a Comment