नाशिक: नाशिक येथील विद्यार्थिनीला धुळ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार करून वेश्या व्यवसायाला लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका महिलेला जेरबंद करण्यात आले; तर इतर ८ आरोपी फरार आहेत.
नाशिक: नाशिक येथील विद्यार्थिनीला धुळ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार करून वेश्या व्यवसायाला लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका महिलेला जेरबंद करण्यात आले; तर इतर ८ आरोपी फरार आहेत.
नाशिकच्या उत्तमनगर परिसरात राहणार्या ९व्या इयत्तेतील विद्यार्थिनीला बेबी चौधरी, तिचा मुलगा गणेश, सपना उर्फ प्रणिता पाटील, विजू, संजय बोरसे, फरहान, अशोक, अनिल पवार यांनी नाशिकमधून पळवून नेले. नगाव शिवारात असलेल्या बेबी चालवीत असलेल्या कुंटणखाण्यात तिला कोंडून देहविक्रय करण्याची सक्ती करण्यात आली. तिने विरोध करताच तिला बेदम मारहाण करण्यात आली. अडीच महिन्यापासून तिच्यावर बलात्कारही करण्यात येत होता.
सोमवारी संधी साधून ही मुलगी कुंटणखान्यातून पळून दोंडाईचा या ठिकाणी आली. तिने थेट पोलीस ठाणे गाठले. दोंडाईचा पोलिसांनी तिच्यासह धुळ्यात येऊन बेबीला अटक केली. तिच्यासह एकूण ९ आरोपींवर अपहरण, बलात्कार, दमदाटी, वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणे; असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.