अॅपलने जादा मेमरी असलेल्या आयपॅड बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून यूएसमध्ये फेब्रुवारीच्या पाच तारखेपासून तो विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. या आयपॅडची किमत ७९९ डॉलर्स असून त्याची मेमरी आहे १२८ जीबी. मेमरीशिवाय आयपॅडमध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा फोर्थ जनरेशन आयपॅडच आहे असे कंपनीने जाहीर केले आहे.
फोर्थ जनरेशन आयपॅडची विक्री नोव्हेंबर १२ पासून सुरू करण्यात आली होती. मात्र याचवेळी विक्री सुरू झालेल्या आयपॅड मिनीसाठी मात्र जादा मेमरी देण्यात आलेली नाही. नव्या आयपॅडच्या वायफाय मॉडेलसाठी ग्राहकांना ९२९ डॉलर्स मोजावे लागणार आहेत. एप्रिल २०१० मध्ये अॅपलने आयपॅड प्रथम बाजारात आणला व तेव्हापासून आजपर्यंत कंपनीने १२ कोटी आयपॅड विकले आहेत. १६,३२,६४ जीबी मेमरीचे आयपॅड ४९९ डॉलर्सपासून उपलब्ध आहेतच.