कर्नाटकातील भाजपची सत्ता डळमळीत

बंगळुरू: भारतीय जनता पक्षाच्या बी. एस. येडीयुरप्पा समर्थक १३ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे कर्नाटकातील शेट्टर सरकार धोक्यात आले आहे. राज्यपालांनी सरकारला विधानसभा अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याची सूचना दिली आहे.

येडीयुरप्पा समर्थक १३ आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा सभापती के. जी. बोपय्या यांच्याकडे सदर केले. या आमदारांनी राजीनाम्याची एक प्रत राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनाही पाठविली आहे.

येडीयुरप्पा समर्थकांनी साथ सोडली तरी आपले सरकार वाचविण्यास आपण समर्थ आहोत; असे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले. या आमदारांवर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल कडक कारवाई करणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Comment