कझाकीस्तानात विमान कोसळून २० ठार

अल्मॅटी: कझाकीस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या अल्मॅटी शहरापासून जवळंच प्रवासी विमान कोसळून झालेल्या अपघातात २० जण ठार झाले. अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही.

कायझेल तू या गावाजवळ स्कॅट एअरलाईन्सचे विमान अचानक खाली कोसळले. हे विमान कॅनडीयन बनावटीचे होते. विमान कोसळण्याच्या कारणांचा शोध लागू शकला नाही; अशी माहिती अल्मॅटीच्या आपत्कालीन सेवा विभागाचे उपाध्यक्ष युरी लीन यांनी दिली.

कझाकीस्तान येथे मागच्या दोन महिन्यात घडलेली ही दुसरी विमान दुर्घटना आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात लष्कराचे विमान कोसळून २७ जण ठार झाले होते.

Leave a Comment