ब्राझीलमध्ये आगीत 180 मृत्युमुखी

ब्रासिलिया – दक्षिण ब्राझीलमध्ये आज पहाटे एका नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत किमान 180 जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. इतर सुमारे 200 जखमी झाले. सांता मारिया या गावातील किस क्लबमध्ये कार्यक्रम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती पोलीस व अग्निशमन अधिकार्‍यांनी दिली आहे. या आगीचे कारण अद्याप समजले नाही. स्थानिक वेळेनुसार पहाटे दोन वाजता ही आग लागली. सुरुवातीला ट्रकमधून सुमारे 70 मृतदेह शवागारात आणण्यात आले असून क्लबमध्ये अजून 20 मृतदेह असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सांता मारिया हे ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना आणि उरुग्वेच्या सीमेवरील महत्त्वाचे शहर आहे.

Leave a Comment