चोरी करण्यासाठी आला आणि झोपी गेला

मध्यमग्राम (पश्चिम बंगाल) – एका घरात चोरी करण्यासाठी तो शिरला, पण तेथे असलेल्या उबदार ब्लँकेटने त्याला भुरळ घातली आणि तो चक्क तेथेच झोपी गेला. मध्यमग्राम येथे ही घटना घडल्याचे वृत्त एका बंगाली दैनिकाने दिले आहे.

प्रतिमा मोडक यांचे घराच्या एका खोलीचे काम सुरू आहे. आपली मुलगी तेथे झोपली असावी, अशी विचाराने प्रतिमा यांनी ब्लँकेट ओढून काढले असता अनोळखी पुरुष पाहून त्यांना धक्काच बसला. ’ तो दारू प्यायला होता आणि आपण कसे आणि केव्हा घरात शिरलो हेच त्याला आठवत नव्हते, ’ असे मोडक यांनी सांगितले. मोडक यांनी आपल्या घरातील नोकरांना हाक मारली. त्यांनी पळत येऊ चोरट्याला पकडले, नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या खोलीच्या खिडकीचे ग्रिल उघड होते, पण जमिनीवरून सहजपणे चढून येता येईल, अशी तिची उंची कमी नाही, असे प्रतिमा यांची मुलगी संचारी हिने सांगितले.

घरातील कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नाही. या प्रकाराबाबत खुद्द चोरटाही गोंधळला होता. ’ आपण रात्री या घरात शिरलो आणि ब्लँकेटची ऊब मिळाल्याने झोपी गेलो, ’ एवढेच त्याने पोलिसांना सांगितले.

Leave a Comment