१५ वर्ष चालणारी मोबाईल बॅटरी

लास वेगास – बऱ्याचदा असे होते की आपल्याला एखादा महत्त्वाचा कॉल येतो किंवा आपल्याला कॉल करायचा असो परंतु, ऐन वेळेला मोबाईलची बॅटरी डाऊन होते. पण मोबाईलची चार्ज केलेली बॅटरी वर्षानुवर्षे चालली तर? मोबाईल कंपन्या ग्राहकांच्या गरजेनुसार रोज नवनवीन तंत्रज्ञान बाजारात आणत असतात. मोबाईलच्या बॅटरीची हीच समस्या लक्षात घेऊन एका कंपनीने बेसिक मोबाईलला डबल ’ए’ बॅटरी जोडून हा मोबाईल सामान्य कामांसाठी वापरल्यास १५ वर्षे चालू शकेल असा दावा केला आहे.

फोनच्या मागे लावलेली ही बॅटरी तुम्हाला स्क्रीनवरही जाणवेल. त्यामुळे स्क्रीनचा थोडा भाग वर आला आहे. या फोनमधून सिमकार्ड नसतानाही इमर्जन्सी कॉल लावता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अमेरिकेतील लास वेगास येथे नुकत्याच भरविण्यात आलेल्या ’इंटरनॅशनल सीईएस’ या प्रदर्शनात हा मोबाईल सादर करण्यात आला. हे तंत्रज्ञान चांगले असले तरी या मोबाईलमध्ये अत्यंत प्राथमिक सुविधाच देण्यात आल्या आहेत. त्या अशा
– फक्त दहा नंबर सेव्ह करता येणे शक्य
– की-पॅडवर फक्त बटणांची सोय
– प्रत्येक बटणावर एक नंबर सेव्ह केला जातो.