मुंबई दि.२५ – आयात शुल्कात वाढ जाहीर झाल्यानंतर वाढलेले सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर आज उतरले असून त्यामागे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सनी फायदा मिळविण्यासाठी केलेली मोठी विक्री कारणीभूत ठरल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

गुंतवणूकदार आणिट्रेडर्सनी केलेल्या मोठ्या विक्रीमुळे सोन्याचे दर १० ग्रॅममागे २०० रूपयांनी उतरले असून आज बाजारत सोन्याचा भाव १० ग्रॅमला ३०६१० वर आला. काल हाच भाव ३०८५० च्या दरम्यान होता. चांदीचे भावही ५९७६५ वरून ५९३४० रू.प्रतिकिलोवर आले. सोन्याच्या वाढलेल्या दरांमुळे लग्नसराई असूनही ग्राहकांकडून मागणी कमी होती. त्यातच विक्रीचा मारा झाल्याने भाव उतरले असे सराफांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने चांदीचे भाव उतरले आहेत. अमेरिकन पॉलिस मेकर्सनी डेब्ट सिलिंग संदर्भातली बोलणी पुढे ढकलल्याने गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. परिणामी सोने आणि चांदीची मागणी एकदमच घटली. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला असलेली मागणीही कमी झाल्याने चांदीचे दरही उतरले असल्याचे जाणकारांचे मत आहे. युरोपात सोने १६७७.९९ डॉलर्स प्रतिऔंस वर आले आहे.