सहा वर्षानंतर करणच्या सिनेमात राणी

दिग्दर्शक करण जौहरने त्याच्या आगामी काळात येत असलेल्या बॉम्बे टॉकीज़’ या सिनेमासाठी अभिनेत्री राणी मुखर्जीला कास्ट केले आहे. या सिनेमात लीड रोल करीत असलेल्या राणीच्या ऑपज़िट रणदीप हुड्डा असणार आहे.

दिग्दर्शक करण जौहर आणि रानी मुखर्जी सहा वर्षानंतर एकत्रित काम करीत आहेत. यापूर्वी दोघाने ‘कभी अलविदा न कहना’ या सिनेमात एकत्रित काम केले होते. रानीचे करियर १९९८ साली आलेल्या करण जौहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमानंतर ट्रैकवर आले होते.

एक सोर्सने दिलेल्या माहितीनुसार, करण गेल्या काही दिवसापासुन त्याच्या ‘स्टूडेंट ऑफ द इयर’ या सिनेमाच्या कामात बिजी आहे. त्यामुळे तो दुस-या सिनेमाकडे लक्ष देत नव्हता. मात्र येत्या काळात तो आता पूर्ण फोकस ‘बॉम्बे टॉकीज़’ या सिनेमावर करणार आहे. गेल्या काही दिवसापासून रानी सुद्धा करण जौहरच्या या नवीन प्रॉजेक्टमुळे खुश आहे. तसे पहिले तर तिची करण जौहरसोबत चांगली ट्यूनिंग आहे. या सिनेमाची शुटींग लवकरच सुरु होणार असल्याचे समजते.

Leave a Comment