प्रिन्स हॅरीला मेंटल प्रॉब्लेम- तालीबान

अफगाणिस्थानातील युद्धक्षेत्रातून नुकतेच मायदेशी परतलेल्या ब्रिटीश राजकुमार हॅरीवर तालिबानी संघटनेने सडकून टीका केली आहे. प्रिन्स हॅरीने अफगाणिस्तानातील युद्ध हे संगणक खेळाप्रमाणेच आपल्याला वाटले असे विधान केल्यानंतर तालिबानने प्रिन्स हॅरीला मेंटल प्रॉब्लेम असल्याची जोरदार टीका केली आहे. युद्धाची तुलना संगणक खेळाशी करणे हे मेंटली विक असल्याचे लक्षण असल्याचे तालिबानी प्रवक्ता झबिदुल्ला मुजाहिद याने म्हटले आहे.

आपली युद्धभूमीवरची २० आठवड्याची कारकीर्द संपवून परतलेल्या राजकुमार हॅरी याने अनेकांप्रमाणेच आपल्यालाही प्ले स्टेशन आणि एकस बॉकस हे गेम्स खेळायला आवडते आणि अफगाणिस्थानातील युद्ध या खेळाप्रमाणेच वाटले कारण ते करताना आपल्याला आनंद मिळाला असे विधान केले आहे. त्यावर तालिबानने टीका करताना अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यावर हे वत्त*व्य करणे भेकडपणाचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तालिबानी प्रवकता झबिदुल्ला अज्ञान स्थळावरून फोनवरून बोलताना म्हणाला की हॅरीने युद्धभूमिवर जी भूमिका बजावली ती उगीचच हाइप करून सांगितली जात आहे. या ब्रिटीश राजकुमाराचे बॉडीगार्ड सतत त्याच्याबरोबर होते आणि तो सुरक्षित स्थळी कसा राहिल याची सतत काळजी घेत होते. तो येथे सैनिकासारखा नाही तर राजकुमारासारखाच राहिला होता. लढणे हे त्याचे कामच नव्हे. त्यामुळे त्याने याबाबत कांहीही वक्तव्य करू नये हे चांगले.

Leave a Comment