एअरटेल, आयडियाच्या दरात दुप्पट वाढ

नवी दिल्ली: सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडत असताना मोबाईल कंपन्यांनीही आपल्या दरात दुप्पट वाढ जाहीर केली आहे. या शिवाय आतापर्यंत मोबाईलवरून मोफत अथवा अत्यल्प दरात मिळणाऱ्या सुविधांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

भारतातील सर्वात अधिक ग्राहक संख्या असलेली भारती एअरटेल आणि बिर्ला समूहाची आयडीया यांनी आपल्या दरात दुप्पट वाढ घोषित केली आहे.

एअरटेलने १ रुपया प्रति मिनिटवरून २ रुपये प्रतिमिनिट दरवाढ केली आहे. पोस्टपेड सेवेत मिळणार्या मोफत कॉल्सची संख्याही सुमारे १० टक्क्यांनी घटविली असून डेटा दरातही वाढ केली आहे.

आयडियाने १. २ पैसे प्रतिसेकंद हा सध्याचा दर २ पैशापर्यंत वाढविला असून काही क्षेत्रात व्यवसाय वृद्धीसाठी दरात दिलेल्या प्रमोशनल सवलती रद्द केल्या आहेत.

नजीकच्या भविष्यात इतर कंपन्याही दरवाढीबाबत मागे राहणार नाहीत अशी चिन्हे आहेत.

Leave a Comment