इंग्लंडचा संघ पुन्हा अडचणीत

चौथ्या वनडे सामन्यात इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याचे पहिले तीन फलंदाज लवकर बाद झाल्याने ३५ षटकात तीन गडी बाद १३८ अशी धावसंख्या झाली होती. त्यामुळे या सामन्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाचे वर्चस्व दिसत होते.

मोहाली येथील स्विंग गोलंदाजीला अनुकूल असलेल्‍या वातावरणात टीम इंडियायाच्या गोलंदाजांना पहिली विकेट मिळविण्‍यासाठी तब्‍बल दहा षटकांची प्रतिक्षा करावी लागली. इयन बेलला इशांत शर्माने दहाव्‍या षटकात बाद केले. बेलने इशांत शर्माला मिडआफॅवरुन उत्तुंग फटका मारण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, चेंडू थर्डमॅनवर भुवनेश्‍वर कुमारच्‍या हातात गेला. बेलने १० धावा काढल्‍या. त्‍यानंतर कुकने केविन पीटरसनच्‍या साथीने अर्धशतकी भागीदारी केली. पीटरसनने बराच संथ खेळ केला. परंतु, या दोघांनी भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.

या सामन्‍यात भारताने सलामीवीर अजिंक्‍य रहाणेला बाहेर ठेवले आहे. त्‍याच्‍याऐवजी रोहित शर्माला संधी देण्‍यात आली आहे. या निर्णयामुळे अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्‍लडने क्रेग किस्‍वेटरच्‍या ऐवजी जॉस बटलरला स्‍थान दिले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा इंग्लंड संघाने ३५ षटकात तीन गडी बाद १३८ अशी धावा केल्या होत्या .

Leave a Comment