अभिनेता सलमान खानचा शिक्का सगळीकडे सध्या जोरात चालत आहे. सध्या त्याच्या लोकप्रियतामुळे त्याच्याकडे मोठ्याप्रमाणात पैसा येत आहे. सलमानला साइन करण्यासाठी काही जण कोट्यावधी रुपये घेऊन मागे लागत आहेत.
अभिनेता सलमान खानचा शिक्का सगळीकडे सध्या जोरात चालत आहे. सध्या त्याच्या लोकप्रियतामुळे त्याच्याकडे मोठ्याप्रमाणात पैसा येत आहे. सलमानला साइन करण्यासाठी काही जण कोट्यावधी रुपये घेऊन मागे लागत आहेत.
काही दिवसापूर्वीच सलमान खानला स्टार इंडिया नेटवर्कने ५०० कोटीची डील फायनल केली आहे. त्यामुळे आता येत्या पाच वर्षात सलमानचे जे सिनेमे रिलीज होतील; ते पहिल्यांदा स्टार इंडिया नेटवर्कवर दाखविले जाणार आहेत. ही डील २०१३ पासून २०१८ पर्यंत चालणार आहे. सलमान खान हा खूपच प्रोफेशनल आहे. तो काम करीत असताना बाकी कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही.
त्याशिवाय सलमान खानची एक दुसरी दुनिया आहे. तो जास्त वेळ दुस-यांसोबत शेयर करीत नाही. गेल्या काही दिवसापासून तो लहान मुलाच्या विश्वात रमलेला असतो. तुम्ही विचार करीत असल की सलमान आणि लहान मुले हे कसे काय शक्य आहे.
सलमानने जरी लग्न केले नसले तरी तो कुणाचा ना कुणाचा तरी काका, किंवा मामा आहे. काही दिवसपासून सलमान हा त्याच्या लहान भाचे, भाच्यांसोबत खूप वेळ घालवत आहे. शिल्लक असलेला वेळ तो भाऊ आणि बहिणीच्या सोबत घालावीत असतो. त्यामुळे आता सर्वच जण त्याचे लग्न लवकर व्हावे अशी अपेक्षा करीत असणार.