ब्रिटीश एअरवेज आणि इंडिगोमध्ये सहकार्य कराराची बोलणी?

लंडन दि.२३ – ब्रिटीश एअरवेज आणि भारताच्या इंडिगो या विमानकंपन्यांत परस्पर सहकार्य कराराची बोलणी झाली असल्याचे वृत्त आहे.त्यानुसार या  इंटरलाईन अॅग्रीमेंटमध्ये तिकीट विक्री आणि सामान वाहतूकीबाबत सहकार्य करण्यासंबंधी बोलणी झाली असून ग्राहकाला कनेक्टींग फ्लाईट घेताना या दोन्ही कंपन्या सोयीस्कर असे एकच तिकीट देऊ शकणार आहेत. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचा महसूल वाढीस वेग मिळेलच पण प्रत्येक कंपनीने आपापल्या विमानांची देखभाल केली तर तो खर्चही कमी होणार आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने हे वृत्त दिले आहे.

इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या मालकीची असलेली ब्रिटीश एअरवेज आणि इंडिगो यांच्यात परस्पर गुंतवणुकीविषयीही बोलणी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दोन्हीही कंपन्यांनी अशा प्रकारची कोणतीही बोलणी झाल्याचा इन्कार केला आहे. इंडिगोची सुरवात इंटरग्लोब एन्टरप्रायझेसचे  राहुल भाटिया आणि यूएस अेअरवेजचे सीईओ राकेश गंगवाल यांनी केली आहे.

सध्या जागतिक पातळीवर विमानवाहतून कंपन्यांनी घेतलेली कर्जे आणि सेवा देताना करावा लागत असलेला जादा खर्च यामुळे कंपन्या पार्टनरशिपमध्ये जास्त उत्सुक आहेत. यामुळे जादा डेस्टीनेशन सेवा देणे शक्य होत आहे. तसेच भारताने गुंतवणूक नियम शिथिल केल्यामुळेही परदेशी कंपन्या गुंतवणुकीस उत्सुक आहेत. जेट एअरवेजची आबुधाबीच्या एथियाड एअरवेजबरोबर तर स्पाईस जेटची अन्य एका परदशी कंपनीबरोबर अशीच बोलणी सुरू असल्याचेही समजते.

Leave a Comment