राज्यात लवकरंच मिळणार डिजिटल रेशनकार्ड

मुंबई: राज्यातील बोगस रेशन कार्डांचा सूळसुळाट रोखण्यासाठी अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने आता आधुनिक डिजिटल रेशनकार्ड वितरीत करण्यात येणार आहेत.

या नव्या रेशनकार्डावर बारकोड असणार आहे. त्यामुळे हे कार्ड मिळाल्यानंतर त्यावरील प्रत्येक तपशील कार्डधारकाला ऑनलाईन बघता येणार आहे. डिजिटल कार्डांमुळे बोगस रेशनकार्ड वितरणावर मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकेल. राज्यात एकूण २ कोटी २० लाख रेशनकार्ड धारक आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना रेशनकार्डांची सविस्तर माहिती जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून आतापर्यंत १ कोटी ९ लाख रेशनकार्डांची छाननी करण्यात आली आहे.

दुसरीकडे बोगस रेशनकार्डधारकांचा शोध घेण्याची मोहीमही विभागाने हाती घेतली असून अशी कार्ड वितरीत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.

Leave a Comment