दिल्ली गँगरेप तपास पोलिसांना रोख पारितोषिके

नवी दिल्ली दि.२२ – डिसेंबर १६ च्या रात्री चालत्या बसमध्ये तेवीस वर्षीय तरूणीवर झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणाचा तपास करून आठवड्याच्या आत सर्व सहा आरोपींना पकडणार्याा दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाला रोख पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे दिल्ली पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी सांगितले.

सामुहिक बलात्काराच्या या घटनेनंतर दिल्ली पोलिसांवर समाजाच्या व देशाच्या सर्व थरांतून टिकेची झोड उठली होती मात्र पोलिसांनी त्वरेने तपास करून आरोपींनी गजाआड करण्याची चांगली कामगिरी बजावली असल्याचे सांगून नीरजकुमार म्हणाले की अशा प्रोत्साहनाची पोलिसांचे मनोबळ वाढविण्यासाठी नितांत गरज असते. ही घटना घडल्यानंतर दिल्ली दक्षिण पोलिस पथकाने १८ तासात पहिला आरोपी पकडला व आठवड्याच्या आत बालगुन्हेगारासाह अन्य पाच जणांनाही अटक केली. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होणे गरजेचे आहे.

दिल्ली पोलिसांना मिळणार्याे फंडमधील ८३ टक्के फंडाचा वापर रोख पारितोषिकांसाठी २०१२ मध्ये केला गेला आहे. अशा प्रकारच्या पारितोषकांसाठी ६६ कोटीचा निधी असून त्यातूनच २०१२- १३ मध्ये चांगली कामगिरी करणार्याक पोलिसांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. आत्तापर्यंत ५० कोटी रूपयांची पारितोषिके दिली गेली आहेत असे वरीष्ठ पोलिस अधिकार्यां कडून समजते. ते म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यागणिक वेगळी पद्धत असून काही ठिकाणी रोख पारितोषिके दिली जात नाहीत.

मात्र हवालदार आणि कनिष्ठ पदावर काम करणार्याज पोलिसांची आर्थिक परिस्थिती पाहिली तर त्यांच्यातील आत्मविश्वास कायम राहण्यासाठी अशा रोख पारितोषिकांची नक्कीच गरज असते. या लोकांचे पगार अगदीच कमी आहेत त्यामुळे रोख रकमेचे छोटे पारितोषिक सुद्धा त्यांना महत्त्वाचे वाटते. त्यातूनच त्यांचे काम करण्यातले बळ सर्व गैरसोयी सोसूनही कायम राहात असते असे सांगून हे अधिकारी म्हणाले की दिल्ली रकमांबरोबरच बाकी वेळा प्रमोशनस्वरूपातही ही पारितोषिके दिली जातात. दिल्ली पोलिसांत २०१२ मध्ये २ हजार पोलिसांना प्रमोशन दिली गेली आहेत.