आर ८ – ऑडीचे अपडेटेड व्हर्जन बाजारात

नवी दिल्ली दि.२२ – जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीने आर ८ चे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणले असून ही स्पोर्टस कार आहे. या व्हर्जनची तीन मॉडेल्स बाजारात आणली गेली आहेत. रेस ट्रॅकवर अतिशय आरामदायी असलेली ही कार रोजच्या वापरासाठीही अत्युकृष्ठ असल्याचा कंपनीचा दावा आहे. अंतर्भात संपूर्णपणे चामड्यापासून बनविलेली ही कार वजनाला केवळ २१० किलोच आहे. अॅल्युमिनियमपासून बनविलेली कारची बॉडी अतिशय मजबूत आहे असे उत्पादकांचे म्हणणे आहे.

व्ही ८ कुपो हे मॉडेल १ कोटी ३४ लाखाला तर व्ही १० कुपो हे मॉडेल १ कोटी ५७ लाखाला आहे. व्ही १० कन्व्हर्टिबल मॉडेल तब्बल १ कोटी ७३ लाखांना आहे. २०१२ या वर्षात ऑडीने भारतात विक्रीत चांगली कामगिरी बजावली असून त्यांनी ९००३ गाड्या विकल्या आहेत. हा आकडा येत्या वर्षात १० हजारांच्या पुढे नेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

विशेष म्हणजे लवकरच रिलीज होत असलेल्या रेस टू या मसाला थ्रिलर चित्रपटात ही गाडी ऑडी अे ८, टीटी कोप ए ४ व क्यू ७ या गाड्यांसोबत वापरली गेली आहे.

Leave a Comment