माध्यमांशी बोलल्याबद्दल कोहलीकडून घेतला खुलासा

मोहाली: माध्यमांशी बोलल्यामुळे रांची येथील सामन्याच्या विजयाचा मानकरी विरत कोहलीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माफी मागावी लागली. त्याने ‘दि टेलिग्राफ’ या विदेशी माध्यमाला खास मुलाखत दिली होती. बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार मालिकेदरम्यान खेळाडूला पत्रकार परिषदेशिवाय इतर वेळी माध्यमांशी बोलता येत नाही.

टेलिग्राफ या वृत्तपत्राला कोहलीने मुलाखत दिली. लिट्ल मास्टर सुनील गावसकर यांनी आपले ‘भावी कर्णधार’ म्हणून कौतुक केल्याने आपण भारावून गेलो. त्याचप्रमाणे आपला आत्मविश्वास दुणावला आणि आपल्यावरील जबाबदारीची जाणीवही झाली; असे कोहलीने या मुलाखतीत सांगितले.
या मुलाखातीबादाल बीसीसीआयने संघ व्यवस्थापनाद्वारे खुलासा मागितला.

आपल्याला नियमांची माहितीच नसल्यामुळे आपल्याकडून ही चूक झाली. यापुढे अशी चूक होणार नाही; असा खुलासा कोहलीने केल्याचे व्यवस्थापनाने बीसीसीआयला कळविले आहे.

Leave a Comment