फिल्मफेयर मध्ये रणबीर, विद्याची धूम

भारतीय चित्रपटक्षेत्राला १०० वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करीत असतानाच ‘बर्फी’ सारखा सिनेमा तयार झाला ही एक अभिमानास्पद बाब आहे. ‘बर्फी’ या सिनेमाला जरी ऑस्कर मिळाला नसला तरी ५८ व्या आयडिया फिल्मफेयर अवॉर्डमध्ये बरेच पुरस्कार मिळाले. रविवारी रात्री मुंबईमधील अंधेरीच्या वायआरएफ स्टूडियोमध्ये यासाठी मोठ्या प्रमाणात कलाकाराची उपस्थिती होती.

फिल्मफेयर पुरस्कार वितरणामध्ये ‘बर्फी’ या सिनेमाला सात पुरस्कार मिळाले. यामध्ये रणबीर कपूरला सर्वोत्तम अभिनेता आणि ‘बर्फी’ सिनेमाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या सिनेमात रणबीर कपूरने मूक-बधिर युवकाची भूमिका साकारली. त्याशिवाय ‘कहानी’ या सिनेमासाठी अभिनेत्री विद्या बालनला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. विद्या तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर सोबत कार्यक्रमासाठी उपस्थित होती.

पुरस्काराची घोषणा होण्यापूर्वी विद्या बालन म्हणाली की; मला माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे. तिने तिची स्पर्धक असलेल्या अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या ‘बर्फी’ या सिनेमातील अभिनयाची तारीफ केली. त्याशिवाय ‘कहानी’ सिनेमाचे डायरेक्टर सुजॉय घोष यांना सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

इरफान खानला ‘पानसिंह तोमर’ या सिनेमासाठीसमीक्षकांचा उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट गीतलेखनासाठीचा पुरस्कार गुलजार यांना ‘जब तक है जान’ या सिनेमातील ‘छल्ला’ या सिनेमासाठी देण्यात आला. त्याशिवाय दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांना लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला.

आयडिया फिल्मफेयर अवॉर्ड्सच्या प्रोग्रामसाठी सूत्रसंचालक म्हणून शाहरुख खान आणि सैफ अली खानने सर्वांची मने जिंकली. यावेळी शाहरुख खान, अनुष्का शर्मा, वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राने नृत्य सादर केले. यावेळी निर्माते रमेश तोरानी, मुकेश भट्ट, सतीश कौशिक, आफताब शिवदासानी, अनुराग बासु, रमेश सिप्पी , सयाली भगत , अमृता राव, आयुष्मान खुराना, शरमन जोशी, शबाना आजमी उपस्थित होते.

Leave a Comment