इंग्लंडविरूद्धची मायदेशातील कसोटी मालिकेतील पराभव त्यानंतर पाकिस्तानकडून वनडे मालिकेत १-२ ने पराभूत झाल्यानंतर राजकोट येथील इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातही यजमान टीमला ९ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. मात्र, दुस-या सामन्यानंतर टीम इंडिया पुन्हा विजयी ट्रॅकवर आली आहे. त्यामुळे आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मायदेशात होणा-या मालिकेसाठी टीम इंडिया पुन्हा सज्ज झाली आहे.
कांगारूंच्या दौर्यापूर्वी टीम इंडिया विजयी ट्रॅकवर
इंग्लंडविरूद्धच्या रांची येथील तिस-या सामन्यात टीम इंडियाने सात गडयांनी विजय मिळवला. टीम इंडियाच्या गोलंदाजांमुळे इंग्लंड संघ अवघ्या १५५ धावातच संपुष्टात आला. विराट कोहलीने नाबाद ७७ धावांची जबरदस्त खेळी करत टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. गेल्या दोन सामन्यातील कामगिरी पाहता टीम इंडियाने पुन्हा कमबक केले आहे. येत्या काळात ऑस्ट्रेलीया सोबत कसोटी मालिका होणार आहे. तोपर्यंत टीम इंडिया पुन्हा फॉर्ममध्ये येईल असे वाटते.
गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा गोलंदाजी विभाग ढासळल्याचे दिसत होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये वेगवान गोलंदाजांना साथ मिळणा-या विकेटवर भारतीय गोलंदाज अपयशी ठरले होते. मात्र, युवा गोलंदाज शमी अहमद आणि भुवनेश्वर कुमारच्या रूपाने टीमला एक गोलंदाजांची एक चांगली जोडी मिळाली. आता गरज आहे ती यांचा योग्य वापर करण्याची.
गेल्या काही दिवसापासून टीम इंडियाची गोलंदाजी पूर्णपणे ढेपळली होती. मात्र गेल्या दोन सामन्यात भुवनेश्वर आपल्या स्विंग गोलंदाजीने विरोधी संघाला अडचणीत आणत आहे तर शमी अचूक लाईन आणि लेंग्थवर चेंडू ठेवून फलंदाजाला धावा काढण्यासाठी झगडवत ठेवत आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघ दबावात आपल्या विकेट फेकत आहे. या दोन्ही गोलंदाजाचा फायदा टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मायदेशात होणा-या मालिकेसाठी होणार आहे.
आगामी काळात इंग्लड विरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया वनडेच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी राहणार आहे. एकदरीत गेल्या दोन सामन्यातील टीम इंडियाची गोलंदाजी आणी फलंदाजीतील कामगिरी पाहता पुन्हा टीम इंडिया फॉर्ममध्ये येत असल्याचे दिसत आहे.