सरोगसी ? नव्हे अर्भकांचे स्मगलिंग

surrogacy

ज्या दांम्पत्यांना मुले होऊ शकत नाही त्यांना सरोगसीचा एक उपाय उपलब्ध झाला आहे. अशा प्रकारची दांम्पत्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान आदी देशांमध्ये भरपूर आहेत. ते भारतात येतात आणि त्यांचे मूल भारतातल्या एखाद्या महिलेच्या पोटात ९ महिने वाढवितात. त्याचा जन्म झाला की त्या मुलावर त्या महिलेचा काही हक्क राहत नाही. मग ही परदेशातली दांम्पत्ये आपले ते मूल घेऊन जातात. अशा प्रकारांमध्ये मूल नेमके कोणाचे असते याला महत्त्व येते.

काही दांम्पत्यांत स्त्रीच्या प्रजनन क्षमतेत दोष असतो. तिचे बीजांड सक्षम नसते. मग भारतातली ती त्रयस्थ महिला आपले बीजांड देते आणि त्या दांम्पत्यातल्या पुरुषाच्या शुक्रजंतूच्या साह्याने ते बीजांड फलित केले जाते आणि त्या महिलेच्या पोटात ते वाढते. अशा प्रकारचे गर्भ हे कृत्रिमरित्या पोटाच्या बाहेर परीक्षा नळीमध्ये तयार केले जात असतात. या प्रयोगात स्त्री आणि पुरुष यांचा कोठेही संबंध येत नाही. अशा प्रयोगात ती महिला काही लाख रुपये घेऊन ९ महिने आपले गर्भाशय भाड्याने देत असते.

गुजरातमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय करणार्यात काही महिला आहेत. आनंद नडियाद, अहमदाबाद आणि सौराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये हा व्यवसाय चाललेला आहे. त्यामधून या महिलांनाही चांगली आर्थिक प्राप्ती होते. हा व्यवहार करण्यापूर्वी एक करार केलेला असतो आणि त्यामध्ये कृत्रिम गर्भधारणेच्या पध्दतीने फलित झालेला गर्भ या महिलेच्या पोटात वाढणार आहे असे लिहिलेले असते. त्यातून काही लोकांना अपत्यप्राप्ती आणि काही गरीब महिलांना आर्थिक प्राप्ती होते, शिवाय हे उपचार करणार्याा डॉक्टरांचा व्यवसायही चांगला चालतो. म्हणून भारत सरकारने या पध्दतीला म्हणजे सरोगेट मदरहूड (दत्तक मातृत्व) ला कायद्याला परवानगी दिलेली आहे.

असे असले तरी याही क्षेत्रात काही दुष्प्रवृत्ती घुसलेल्या आहे. काही महिलांनी आपल्याच नवर्या.पासून आपल्या पोटात वाढत असलेले बाळ हे सरोगेट मदरहूड मधून जन्माला येत असल्याचे खोटेच दाखवून ती पूर्णपणे आपली असलेली मुले परदेशी लोकांना विकायला सुरूवात केली आहे. अशा प्रकारांत जन्माला येणार्याआ बाळाचा त्या परदेशी दांम्पत्याशी कसलाच संबंध नसतो. हे सरळ सरळ अर्भकांचे स्मगलिंग आहे. मात्र डॉक्टर मंडळी पैसे खाऊन हे मूल सरोगसी मधलेच आहे असे खोटेच लिहून देतात आणि त्या बाईचे पूर्णपणे तिचेच असलेले, नैसर्गिकरित्या जन्माला येणारे ते मूल परदेशी निर्यात करतात. त्यात कसलाही प्रयोग न करता त्यांना खूप प्राप्ती होते आणि अशा रितीने सरोगसीच्या माध्यमातून नवजात अर्भकांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment