शेवटच्या षटकात धोनी डेंजर- कुक

गेल्या काही सामन्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आक्रमक फलंदाजी करीत टीम इंडियाचा डाव सावरला आहे. त्याची आक्रमक फलंदाजी ही टीम इंडियाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. शेवटच्या षटकात धोनी हा आक्रमक फलंदाजी करीत असल्याने तो एक डेंजरस फलंदाज असल्याची कबुली इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुकने दिली. मालिकेतील दुस-या सामन्‍यात टीम इंडियाकडून धोनीच्या या आक्रमक फलंदाजीमुळे पराभूत व्हावे लागले असे मत कुकने व्यक्त केले.

गेले काही सामन्याचा अभ्यास केला असता शेवटच्या हाणामारीच्या षटकात आक्रमक फलंदाजी करण्यासाठी धोनी हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. धोनीने आपल्या दमदार खेळीने तो एक गुणवान खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या कित्येक सामन्यात मधली फळी अपयशी ठरल्यानंतर त्याने शेवटच्या हाणामारीच्या षटकात आक्रमक फलंदाजी करून टीम इंडियाचा डाव सावरला आहे. भारतातील सपाट खेळपट्टय़ांवर त्याला रोखणे खूप कठीण जात असल्याचे त्याने स्पष्ट केले.

कोची येथील इंग्लंडविरुद्च्या दुस-या एकदिवसीय सामन्यात धोनीने ६६ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्‍या मदतीने ७२ धावा ठोकाल्‍या होत्‍या. त्‍याने स्‍लॉग ओव्‍हरमध्‍ये अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्‍या मदतीने इंग्‍लंडच्‍या गोलंदाजाची धुलाई केली होती. त्‍याच्‍या या खेळीमुळेच टीम इंडियाला ५० षटकात २८५ धावसंख्‍येपर्यंत पोहचता आले होते. या सामन्‍यात इंग्‍लंडला दारूण पराभूत व्हावे लागले होते.

Leave a Comment