टीम इंडियाची खराब सुरुवात

पहिल्या सामन्यातील निराशजनक कामगिरीनंतर कोची येथील दुस-या सामन्यात टीम इंडीयची सुरुवात खराब झाली आहे. इंग्‍लंडने पाचव्‍याच षटकात भारताची सलामीची जोडी तंबूत पाठविली. इंग्‍लंडविरुद्ध दुस-या वन डे सामन्‍यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र टीम इंडियाच्या सलामीवीराणे त्यांची निराशा केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा टीम इंडियाने १८ षटकात तीन बाद ८३ धावा केल्या होत्या.

कोची येथे खेळ्ल्या जाना-या दुस-या सामन्यासाठी टीम इंडिया संघात एक बदल केला असून अशोक डिंडाच्‍या जागेवर शमी अहमदला संधी देण्‍यात आली आहे. इंग्‍लंडनेही एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज टीम ब्रेस्‍नन जायबंदी झाला आहे. त्‍याऐवजी ख्रिस वोक्‍सला संघात स्‍थान देण्‍यात आले आहे.

कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय सलामीविरानी फोल ठरविला. जेम्‍स डर्नबॅचने सर्वप्रथम गौतम गंभीरचा अप्रतिम इन स्विंगरवर त्रिफळा उडविला. तर दुस-याच षटकात स्‍टीव्‍ह फिनने अजिंक्‍य रहाणेचा त्रिफळा उडविला. अवघ्‍या १८ धावांवर भारताची सलामीची जोडी परतली. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा टीम इंडियाने १८ षटकात तीन बाद ८३ धावा केल्या होत्या. विराट कोहली व युवराज सिगने दमदार फलंदाजी करत टीम इंडियाचा डाव काहीसा सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र युवराज सिग ३२ धावावर बाद झाला. कोहली १९ तर सुरेश रैना १० धावा काढून नाबाद होते. स्पर्धेतील आवाहन टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागणार आहे.

Leave a Comment