नवी दिल्ली दि.१६- जयपूर येथे या आठवड्यात होत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात महिलांना सरकारी तसेच खासगी नोकर्यायत ५० टक्के आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला जाईल असे खात्रीलायक वृत्त आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच खुद्द तशी विनंती काँग्रेस वरीष्ठ नेत्यांना केली असून महिला सबलीकरणासाठी वरवरचे नाही तर दीर्घकालीन आणि भक्कम धोरण ठरविले जावे अशी त्यांची अपेक्षा आहे.
दिल्लीतील गँगरेप प्रकरणानंतर महिलांच्या बाबत सोनिया गांधी अधिक संवेदनशील बनल्या असल्याचे काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. त्यातूनच महिलांना सरकारी आणि खासगी नोकर्यांनत ५० टक्के आरक्षण आणि संसदेत पुन्हा एकदा महिला कोटा बील सादर करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता महिलांप्रती पक्षाला असलेली काळजी दाखविण्याचीही संधी आहे. त्याचा पुरावा म्हणजे काँग्रेसने आपली स्लोगनही ‘ पहले देश की महिलाओंका सम्मान, बाद में भारत निर्माण‘ असे केले असून हेच स्लोगन स्वीकारले जावे असा ठरावही करण्यात येत आहे.
चिंतन शिबिरात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे भाषणही महिला सबलीकरणाला पुष्टी देणारेच करणार आहेत असेही समजते. महिलांपोटी असलेली संवेदनशीलता दाखविणे आणि महिलांना रोजच्या व्यवहारात ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्या प्रश्नांवर चर्चा करून उपाययोजना करणे यावरही या शिबिरात भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने त्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांनाही महिलांच्या प्रश्नांना टॉप प्रायोरिटी देण्याचे आदेशही जारी केले आहेत
काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच जेंडर इश्यूचा सखोल अभ्यास करण्यासाठी काँग्रेस कमिटी नेमण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश या समितीचे समन्वयक आहेत तर महिला नेत्या अंबिका सोनी, गिरीजा व्यास, जयंती नटराजन या समितीच्या पॅनलवर आहेत.