असेही होऊ शकते?

दोन देशातले युध्द हे दोन देशातल्या काही वादाच्या मुद्यातून उद्भवलेले असते असे आपण मानतो आणि सर्वसाधारण माणसाचाही तसाच समज असतो. परंतु फार तपशीलात जाऊन खोलवर विचार करणारे काही लोक असे सांगत असतात की युध्दामागच्या वरवर दिसणार्याह कारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. तेव्हा त्यामध्ये अतिशय वाईट पध्दतीचे हितसंबंध दिसायला लागतात. किंबहुना जगातल्या सगळ्या युध्दांचा अभ्यास केला तर त्यातून फार विचित्र असे निष्कर्ष हाती यायला लागतात. ज्यांच्याकडे सामान्य माणसाने त्यादृष्टीने कधी पाहिलेलेच नसते. कोणते तरी दोन देश आपापसात लढत असतात परंतु ते दोन देश लढत असले तरी ते प्रत्यक्षात तिसर्यायच देशाच्या अर्थकारणासाठी लढत असतात आणि त्या अर्थकारणाचा शोध घ्यायला लागल्यास मोठे चक्रावून टाकणारे निष्कर्ष हाती यायला लागतात.

सध्या सगळ्या जगातली युध्दे त्या त्या देशातून तर वैरातून तर निष्पन्न झालेली असतातच पण ती युध्दे शस्त्रास्त्राचा व्यापार करणार्यात देशांनी घडवलेली असतात आणि तेच देश त्या दोन छोट्या देशांना झुंजवून आपली शस्त्रे विकत असतात. खरे म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन  देशाने सुखाने नांदायला पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर प्रचंड खर्च करून आपण अमेरिकेची धन करतो त्या ऐवजी शांतीने नांदून शस्त्रांची खरेदी टाळली पाहिजे आणि शस्त्रावर खर्च होणारे पैसे देशातल्या विकास कामांवर खर्चून सामान्य गरीब माणसांचे आवश्यक प्रश्न सोडवले पाहिजेत. दोन्ही देशांमध्ये दोन वेळा खायला न मिळणारे लाखो लोक आहेत. शेताला पाणी देणार्याक अनेक योजना रखडल्या आहेत. सर्वांना शिक्षण मिळत नाही. आरोग्याच्या सोयी पुरवता येत नाहीत. पण दोन्ही देश या सगळ्या सोयींवर खर्च करण्याऐवजी शस्त्रांच्या खरेदीवर पैसे खर्च करतात. त्यामुळे अमेरिका श्रीमंत होते.

भारत आणि पाकिस्तान सारखेच अनेक युध्दजन्य देश आहेत. त्यांनी शांतीने राहायचे ठरवले तर अमेरिका भिकेला लागेल. कारण अमेरिकेची श्रीमंती शस्त्रांच्या व्यापारावर अवलंबून आहे आणि त्यांचा शस्त्रांचा व्यापार गरीब देश लढतात म्हणून चालला आहे. हे पाकिस्तानच्या नेत्यांना समजत नाही. कधी कधी या दोन देशांच्यामध्ये तणाव निवळायला लागतो परंतु तो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने वाढवला जातो. कारण हे दोन देश शांततेत राहायला लागले तर आपली शस्त्रे खपणार नाही अशी भिती शस्त्रांची निर्मिती करणार्याह आणि विक्री करणार्याश देशांना आणि दलालांना वाटायला लागते.

गेल्या ६ जानेवारीपासून या दोन देशांत जो तणाव वाढत चालला आहे. त्यामागे हेच कारण असावे असा अंदाज काही राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे. सध्या भारत सरकार बर्यानच खर्चात कपात करत आहे. कारण सरकारकडे पैसा नाही. या कपातीमध्ये सरकारने संरक्षण सिध्दतेवर होणार्यार खर्चाचाही समावेश केला आहे आणि संरक्षण सिध्दतेवर होणार्या. खर्चापैकी दहा हजार कोटी रुपये कपात केले आहेत. आता सरकारने एवढी कपात केल्यावर शस्त्रांची निर्मिती करणार्या. देशांचा तेवढाच धंदा कमी होणार आणि या शस्त्रांच्या खरेदी विक्रीमध्ये दलाली करणार्यान दलालांची दलालीही तेवढ्याने कमी होणार. अशी भिती वाटल्यामुळे अमेरिकासारखे शस्त्रांचे निर्माते आणि दलालीवर श्रीमंत झालेले काही एजंट अस्वस्थ झाले आणि त्यांनी सरकारने ही कपात करू नये यासाठी काहीतरी केले पाहिजे असा विचार सुरू केला.

सरकार हा खर्च कधी करील?  भारत-पाक सीमेवर गडबड झाली तर सरकार हा खर्च करील. कारण गडबड झाली तर संरक्षण सिध्दता वाढवावी लागेल. पण सीमा तर शांत आहे. मग ती शांत सीमा आपणच का पेटवू नये असा विचार करून या लोकांनीच हा तणाव निर्माण केला आहे. सध्या नवी दिल्लीमध्ये याच एका विषयावर मोठी चर्चा सुरू आहे. हे शस्त्राचे दलाल कोणत्या मार्गाने तणाव वाढवतात आणि आपल्या कारवाया कशा करत असतात याचा शोध घेतला जात आहे. परंतु सरकारने संरक्षण खर्चात कपात करणे आणि तणाव वाढणे ह्या गोष्टी एकदम घडल्या आहेत आणि तणाव वाढण्यासारखे कसलेच कारण सध्या तरी दिसत नाही. म्हणजेच ही गडबड धंद्यासाठी मुद्दाम निर्माण केलेली आहे. या गोष्टी भारत, पाकिस्तान, कोरिया, चीन, सौदी अरेबिया, इराण, इराक इत्यादी युध्दग्रस्त देशातल्या लोकांना कळतील त्यादिवशी शांतताही नांदेल आणि अमेरिकेसारख्या आगलावू देशांचे पितळ उघडे पडेल.

युरोप खंडामध्ये २० व्या शतकाच्या पहिल्या पूर्वार्धात प्रचंड विनाशकारी युध्दे झाली. त्यातून मोठा नरसंहार झाला. आर्थिक हानी प्रचंड झाली. त्यावरून या देशातल्या लोकांनी धडा घेतला असून यापुढे युध्दे न करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या ५० वर्षात युगोस्लाव्हियाचा एक अपवाद वगळता कोणत्याही यूरोपीय देशात युध्दे झालेली नाहीत. उलट त्यांनी यूरोपीयन युनियन अशी संघटना स्थापून दोन देशातल्या सीमा पुसट केल्या आहेत. आशियाई देशांना हे कधी कळणार आहे?

Leave a Comment