अमेरिकन विमानतळांवरून बॉडी स्कॅनर हटविणार

वॉशिंग्टन: प्रवाशांना प्रचंड अस्वस्थेचा अनुभव देणारे ‘बॉडी स्कॅनर’ विमानतळांवरून हटविण्याचा निर्णय अमेरिकेच्या वाहतूक सुरक्षा विभागाने घेतला आहे. जून महिन्यापर्यंत सर्व विमानतळांवरील स्कॅनर हटविण्यात येणार आहेत.

सन २००९ मध्ये एक प्रवाशाने कपड्याच्या आतून स्फोटके आणल्याचे निदर्शनास आल्यानंतर अमेरिकेने हे स्कॅनर विमानतळांवर बसविले. या स्कॅनरमधून कपड्यांच्या आतील संपूर्ण मानवी देहाचे चित्रण होत असल्याने प्रवाशांच्या मनात या स्कॅनर तपासणीचा प्रचंड मोठा ताण निर्माण होत असे.

ज्या कंपनीने हे स्कॅनर तयार केले त्या कंपनीला पूर्वी मान्य केल्याप्रमाणे स्वयंचलित आणि कोणतेही चित्रण न करणारे आणि शरिरावरील धातू अथवा प्लॅस्टिक स्फोटकांचा स्वतः शोध घेणारे सॉफ्टवेअर मुदतीत बसविण्यात अपयश आल्याने हे स्कॅनर कढून टाकण्यचा निर्णय घेतल्याचे टीसीएच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Comment