हिटलर आणि इव्हा यांचे अखेरचे फोटो प्रसिद्ध

हिटलरचा वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये पराभव झाल्यानंतर आत्महत्त्या करण्यापूर्वी ज्या बंकरमध्ये त्याने आश्रय घेतला होता तेथील त्याचे व त्याची पत्नी इव्हा ब्राऊन यांचे फोटो लाईफ मासिकाने प्रथमच प्रसिद्ध केले आहेत. लाईफ मासिकाचा माजी फोटोग्राफर विल्यम वँडीवर्ट याने १९४५ साली हे फोटो प्रत्यक्ष बंकरमध्ये जाऊन काढले होते. हिटलरच्या बंकरमध्ये प्रवेश करून फोटो घेणारा तो पहिला परदेशी फोटोग्राफर होता.हे फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाईट आहेत.

राईश चॅन्सलरीच्या खालीच खणण्यात आलेल्या बंकरमध्ये हिटलरने आश्रय घेतला होता. हे फोटो मेणबत्तीच्या प्रकाशात काढले गेले आहेत व यापूर्वी ते कधीच प्रसिद्ध केले गेलेले नाहीत. त्यात सोफ्यावर बसलेला हिटलर आणि इव्हा यांची छबी खेचली गेली आहेच पण सोफ्यावर पसरत चाललेला त्यांच्या रक्ताचा मोठा डागही त्यात टिपला गेला आहे. अन्य फोटोत उध्वस्त झालेल्या बंकरमध्ये डोकावून पाहणारा लाईफ मासिकाचा वार्ताहर, १६ व्या शतकातले इटालियन पेंटींग, हिटलर आणि इव्हाचे प्रेत जेथे जाळण्यात आले ती जागा, हिटलरचे डेस्क, अर्धपुतळा, बर्लिन स्टेडियममध्ये हिटलरला सॅल्यूट करणारा अमेरिकन सैनिक व राईश चॅन्सलरीवर असलेले प्रचंड मोठे ब्राँझ स्वस्तिक वाहून नेणारा रशियन सैनिक यांच्या फोटोचा समावेश आहे..

Leave a Comment