सोने आयात यंदा २५ टक्कयांनी घटण्याचे संकेत

नवी दिल्ली दि.१८ – यंदाच्या म्हणजे २८ फेब्रुवारीला सादर होणार्यात अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात ६ टक्के वाढ केली जाणार असल्याचे संकेत मिळत असून त्यामुळे यंदाच्या वर्षात सोने आयातीत किमान २५ टक्के घट होईल असे ऑल इंडिया जेम्स अॅन्ड ज्युवेलरी ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष बच्चराज बामलवा यांनी सांगितले.

सरकारचा सोने आयातीबाबतचा दृष्टीकोन आणि रिझर्व्ह बँकेने सोने खरेदीसंदर्भात नुकतीच केलेली टिपण्णी पाहता आयात शुल्क वाढ नक्की समजली जात आहे. असे झाले तर भारतात सोन्याचे दर वाढतील आणि वाढलेल्या दरांमुळे सोन्यात गुंतवणूक करणार्यांाना गुंतवणुकीसाठी सोन्याचे आकर्षण राहणार नाही. त्यातच दररोज होत असलेले रूपयाचे अवमूल्यनही गुंतवणूकदारांना लक्षात घ्यावे लागणार आहे असे बच्चराज म्हणाले.

अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही भारतात आयात केले जात असलेले सोने ही चिंतेची बाब असल्याचे पूर्वीच वक्तव्य केले आहे. भारताचे परकीय चलन वाचविणे आणि वित्तीय तूट भरून काढणे सोने आयात कमी झाल्यास शक्य होणार आहे. त्यातच सरकारने गोल्ड बाँड आणल्यास व त्या गुंतवणूकीवर वादग्रस्त अॅम्नेस्टी टॅक्स लागू झाला तर सोने आयात ६० टक्क्यांपर्यंतही घटू शकते असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. भारतीय घरांत साठविले गेलेले सोने बाहेर यावे यासाठी अॅम्नेस्टी योजना आखली गेली असून भारतीयांकडे २० ते २५ हजार टन सोने घरात पडून आहे असा एक अंदाज आहे.

Leave a Comment