झुकेरबर्गला मेल पाठवा – १०० डॉलर्स भरा

फेसबुक या जगभरातील लोकप्रिय सोशल नेटवर्कचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याला मेल पाठवायची इच्छा अनेकांची असते मात्र ती मेल त्याच्यापर्यंत पोहोचेल की नाही, तो ती पाहील की नाही अशी शंकाही पाठविणार्याेच्या मनात येते. आता मात्र फेसबुकनेच तुमची मेल मार्क पर्यंत खात्रीशीर पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. तुमची मेल मार्कपर्यंत पोहोचण्यासाठी मेल सोबत १०० डॉलर्स त्यासाठी पाठवावे लागणार आहेत.

मार्कबरोबरच अन्य महत्त्वाच्या व्यक्तींनाही तुम्हाला या मार्गाने तुमच्या फ्रेंडस यादीत समाविष्ट करता येणार आहे. स्पॅम मेलचा उपद्रव कमी व्हावा आणि फेसबुकचा महसूल वाढावा असे दोन्ही उद्देश साध्य होण्यासाठी ही योजना आखली गेली असल्याचे समजते. त्याची प्रत्यक्ष सुरवात डिसेंबरपासूनच झाली असून अनेाखळी व्यक्तींना फ्रेंडसच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी फेसबुकने १ डॉलर चार्ज आकारायला सुरवात केली आहे. मात्र व्हीआयपी व्यक्तींपर्यंत पोहोचायचे असेल तर १०० डॉलर्स भरावे लागणार आहेत.

मार्क पर्यंत पोहोचण्याची ही योजना सध्या फक्त अमेरिकेपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली असून प्रत्येक आठवड्यात अशी एक मेल मार्कपर्यंत पोहोचणार आहे. अन्य कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तींशीही या प्रकारे संपर्क करता येईल त्याची यादी अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.