झूमधील चिपांझी पोर्न फिल्मची दिवानी

chimpanzi

गिना नावाची चिपांझी मादा पोर्न फिल्मची दिवानी असल्याचा शोध प्रिमॅटॉलॉजिस्ट पॅब्लो हेरेरोस यांना लागला असून त्यासंबंधीचा वृत्तांतच त्यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यांनी झूमध्ये पिंजर्याात राहणार्यां प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी दौराच काढला होता. त्यात या प्राण्यांच्या अनेक मजेदार गोष्टी त्यांना आढळल्या आहेत. गेली काही वर्षे पॅब्लो हे संशोधन करत आहेत.

या दौर्या्त स्पेन येथील सेव्हिली झूलाही त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांना असे आढळले की या झूमधील गिना नावाची चिपांझी मादा टिव्हीवर रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने पोर्न फिल्म बघण्यात विशेष रूची घेते. पेब्लो म्हणाले की पिंजर्याेत असलेल्या प्राण्यांना त्यांच्याभोवतीचा परिसर शक्यतो नैसर्गिक वाटेल की जेणेकरून ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अॅलर्ट राहतील याची काळजी घेतली जाते. पिंजर्यारतच कृत्रिम झाडे, खेळणी, थोडी चढउतार असलेली जमीन अशा सोयी केल्या जातात. त्यामुळे हे प्राणी चपळ राहतात तसेच त्यांचे मानसिक स्थैर्यही चांगले राहते.

सेव्हिली झूमधील अधिकार्यांंनी गिनाच्या पिंजर्यायत काचेत बसविलेल्या एक टिव्ही ठेवला आणि रिमोट तिच्या हाती सोपविला होता. काही दिवसांतच गिनाने रिमोट व्यवस्थितपणे वापरण्याचे कौशल्य आत्मसात केले. मात्र ती टिव्हीवर नक्की काय पाहते याचा शोध घेतला तेव्हा रात्री ती टिव्हीवर रिमोटच्या सहाय्याने पोर्न चॅनल बरोबर लावून पोर्न फिल्म पाहण्याचा आनंद घेते असे आढळले. अर्थात याचा अर्थ इतकाच की माणसाप्रमाणेच प्राण्यांनाही लैगिक जीवनाची तीव्र इच्छा असते असे पॅब्लो यांचे निरीक्षण आहे.