सैफला आवडत नाही नवाब म्हटलेले

बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान कोणत्याही पदवीवर विश्वास ठेवत नाही. त्याला नवाब म्हटलेले तर बिलकुल आवडत नाही. सैफला त्याचे वडील मंसूर अली खान यांच्या निधनानंतर ऑक्टोबर २०११ मध्ये पटौदीचे दहावे नवाब म्हणून त्याला पदवी देण्यात आली होती.

गेल्या काही दिवसापासून सैफ त्याच्या आगामी काळात येत असलेल्या ‘रेस -२’ या सिनेमाच्या प्रचारात व्यस्त आहे. सध्या तो लंडन मध्ये या सिनेमाचा प्रचार करीत आहे. यावेळी पीटीआईशी बोलताना सैफ म्हणाला’ ‘पटौदीचा नवाब म्हटल्यानंतर मला वडिलाची आठवण होते. त्यामुळे मला जर कोणी नवाब म्हणून बोलवत असेल तर मला हे आवडत नाही. अशा प्रकारची उपाधी मला एक सिने अभिनेता म्हणून आवडत नाही.’

क्रिकेटच्या दुनियाचा टायगर असलेल्या पटौदीच्या नावाने प्रसिद्ध मंसूर अली खान यांच्या नवे एक वार्षिक व्याख्यानमला आयोजित करण्यत आली आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (बीसीसीआई) ने अजून या कार्यक्रमाला अतिंम रूप दिले नाही. सैफची आई शर्मिला टैगोरने बीसीसीआयच्या अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पत्र लिहून नाखुशी दाखवली होती. सैफने सीक्वल असलेल्या ‘रेस-२’ या सिनेमात रणवीर सिंहचा रोल केला होता. या सिनेमात जॉन अब्राहम, अनिल कपूर आणि दीपिका पादुकोण हे कलाकार काम करीत आहेत. करीना कपूर सोबत लग्न केल्यानंतर सैफचा हा पहिलाच सिनेमा रिलीज होत आहे.

Leave a Comment