यूकेमध्ये फेसबुक युजरची संख्या घटली

युनायडेट किंगडममध्ये फेसबुक युजरची संख्या तब्बल ६ लाखांनी घटली असल्याचे सोशल ब्रेकर्स या मॉनिटरींग फर्मच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तज्ञांच्या मते फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसी आणि फेसबुक फटिग यांत युजरचा गोंधळ झाल्याचा हा परिणाम असू शकतो. तर पॉकेट लिंक वेबसाईटचे प्रमुख स्टुअर्ट माईल्स यांच्या मते फेसबुकला युजरना पुन्हा आकर्षित करण्यासाठी मेकओव्हरची गरज आहे. फेसबुकचा वाढता आकार आणि जाहिराती यांच्यामुळे युजर फेसबुकपासून दूर जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

फेसबुकने मात्र हे सर्व दावे फेटाळले असून त्यांच्या वाढीबाबत समाधानच व्यक्त केले आहे. फेसबुक प्रवक्त्याच्या मते जगभरातील युजरपैकी दररोज किमान निम्मे युजर फेसबुक अॅक्सेस करतात आणि यूके जगातील सहाव्या क्रमांकाचा मोस्ट अॅक्टिव्ह फेसबुक युजर आहे. डिसेंबर महिन्यात ३३ दशलक्ष युजरनी फेसबुक अॅक्सेस केले आहे.  सध्या फेसबुक युजरमध्ये यूएस टॉपवर असून तेथे युजरची संख्या १६९ दशलक्ष आहे. त्याखालोखाल ब्राझील ६५ दशलक्ष व भारत ६३ दशलक्ष असा क्रम आहे.

सोशल ब्रेकर फर्मच्या म्हणण्यानुसार फेसबुक त्यांच्या युजरची जी संख्या सांगते आहे त्याच्या निम्मीच प्रत्यक्षातील युजरची संख्या आहे. कारण बरेच युजर मल्टीपल डिव्हायसेस द्वारा फेसबुक अॅकसेस करत असून त्यामुळे संख्या जास्त दिसते आहे.

Leave a Comment