सुश्मिताला प्रतीक्षा तिच्या एन्ट्रीची

गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री सुश्मिता सेन बॉलीवूडमध्ये परतण्याची प्रतीक्षा करीत आहे. तिचा शेवटचा ‘नो प्रॉब्लेम’ हा सिनेमा फारसा चालला नसल्याने ती काही काळ अडचणीत सापडली होती. नुकत्यच एका क्लबच्या लोचींग पार्टीत सहभागी झालेली सुश्मिता म्हणाली की, यावर्षी तरी मी एकादया सिनेमातून झळकेल या अपेक्षेने माझ्या सिनेमाची प्रशंसक वाट पाहत आहेत.

गेल्या काही दिवसापासून सुष्मिताने बॉलीवुडमधून मोठी सुट्‍टी घेतली आहे. सुष्मिता याबाबत बोलताना म्हणाली, ‘ मी ब-याच दिवसपासून इंडस्ट्रीजपासून दूर राहिले आहे. त्यामुळे माझे प्रशसक माझ्या पुनरगमनाची वाट पाहत आहेत. मी जरी सध्या मोठा ब्रेक घेतला असला तरी चांगल्या स्क्रीपटची वाट पाहत आहे. मला चंगली स्क्रीपट मिळाल्यास तो सिनेमा स्वीकारण्यास मी तयार आहे.’

सुष्मिता सेनची स्वताची एक कंपनी आहे. त्या कंपनीचे नाव आईएमशी असे आहे. ही कंपनी मिस यूनिवर्स स्पर्धेत सहभागी होणा-या मुलींना तयार करण्याचे काम करीत असते. अभिनेत्री सुष्मिता सेनने बॉलीवुडमध्ये पुन्हा एन्ट्री करण्याची तयारी दर्शविली आहे. तेंव्हापासून ट्‍विटरवर तिच्या प्रशंसकानी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता येत्या काळात लवकरच सुष्मिता सेन मोठ्या पडदयावर झळकण्याची सर्वजन उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment