‘मि. इंडिया-२’ मधून झळकणार श्रीदेवी

गेल्या काही दिवसापासून श्रीदेवीने बॉलीवूडमध्ये काम करण्याचे मनावर घेतलेले दिसत आहे. म्हणूनच की काय आता तिने आगामी काळात येत असलेल्या आणखीन एक सीक्वलमध्ये काम करण्याचे ठरविले आहे. सध्या श्रीदेवीचे हसबैंड बोनी कपूर त्यांच्या १९८७ च्या सुपरहिट ‘मि. इंडिया’ ची पुढील काहनी प्रेक्षकासमोर आणण्याचा विचार करीत आहेत.

याबाबत बोलताना श्रीदेवी म्हणाली, ‘ आगामी काळात मी ‘मि. इंडिया-२ ‘ या सिनेमात काम करण्याबाबत अजून ठरविलेले नाही. त्याबाबतीत मी अजून तरी काही विचार केला नाही. माझ्या मुलींचा विचार करून जवळ जवळ १५ वर्षे मी सिनेइंडस्ट्रीज पासून दूर होते. सध्या मी पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. मात्र ‘मि. इंडिया-२ ‘ या सिक्वेल असलेल्या सिनेमात काम करण्याचे अजून तरी ठरविले नाही. त्याशिवाय हा सिनेमा येणार की नाही याबाबत मला कल्पना नाही.’

श्रीदेवी जरी काम करण्यासाठी नाही म्हणत असली तरी तिकडे मात्र काही दिवसापासून बोनी कपूर या सिनेमाची स्क्रिप्ट फायनल करण्ययाच्या कामात व्यस्त आहेत. सुरुवातीच्या काळात ते ‘नो एंट्री’ चा सीक्वल करनार आहेत. त्यानंतर ‘मि. इंडिया’ चा सिक़्वेल करणार असल्याचे सूत्राकडून समजते.

Leave a Comment