
पुणे दि.१४- रविवारी रात्री पुण्यातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उडवून देण्यात येणार असल्याची धमकी थेट पोलिसांनाच फोनवरून दिली गेली आणि पोलिस विभागाची एकच धावपळ उडाली. रविवारी सायंकाळच्या वेळी ही धमकी फोनवरून मिळताच पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेऊन मंदिराभोवती कडेकोट सुरक्षा तैनात केली. रविवारचा दिवस असल्याने मंदिरात भाविकांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी मंदिराजवळ जास्त वेळ कोणालाही थांबू दिले नाहीच पण नागरिकांसाठी वाहतूकही बंद केली.
