कोहली ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू

टीम इंडियाचा युवा फलंदाज विराट कोहलीला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. त्याला नुकताच सीएट पुरस्कार सोहळ्यात, ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीत येथे नुकत्यच झालेल्या सीएट अवॉर्ड्स कार्यक्रमात त्याचा मान्यवराच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विराटने २०११-१२ सालच्या क्रिकेट हंगामात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे समजते.

विशेष म्हणजे, या पुरस्काराच्या शर्यतीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला यांना मागे टाकून टीम इंडियाचा युवा फलंदाज असलेल्या विराट कोहलीने ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू’ पुरस्कार मिळवला आहे. त्याशिवाय ‘सर्वोत्कृष्ट टीम’चा पुरस्कार सध्या भारताविरुद्धची वनडे मालिका जिंकणा-या पाकिस्तानी संघाला देऊन गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार पाक संघाने स्वीकारला.

याशिवाय सीएट अवॉर्ड्स कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी क्रिकेटर जहीर अब्बास यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Leave a Comment