मटरु की बिजली का मंडोला

‘ओमकारा’, ’7 खून माफ’ नंतर दिग्दर्शक विशाल भारद्वाज आता ’मटरु की बिजली का मंडोला’ अशा लांबलचक नावाचा चित्रपट घेऊन आला आहे. विशालचा हा चित्रपट कॉमेडी ड्रामा आहे. हरियाणाच्या एका गावात घडणारी ही कथा.

मंडोला (पंकज कपूर) एक श्रीमंत उद्योगपती आहे. मंडोलाला दारु प्यायला खूप आवडतं. मंडोलाच्या मुलीचे नाव बिजली (अनुष्का शर्मा) आहे. त्याचा एक खास माणूस असून त्याचे नाव मटरू (इरफान खान), या दोघांबरोबरही मंडोलाचे नाते आबंट-गोड आहे.

मटरूने दिल्लीतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्याला नोकरी न मिळाल्याने तो गावात परत येतो, आणि मंडोलाच्या कुटुंबीयांची सेवा करतो. कॉलेजमध्ये शिकत असताना बिजलीचे बादल (आर्य बब्बर)वर प्रेम जडते. बादलची आई चौधरी देवी (शबाना आझमी) राजकारणी स्त्री आहे. बिजली आणि बादलचे लग्न ठरते. आणि… यानंतर चित्रपटात खरा ट्विस्ट येतो.

चित्रपटाच्या शुटींग दरम्यान विशाल भारद्वाज मधील इको फ्रेन्डली माणुस जागा झाला होता. त्यामुळेच पंजाबमधील एका शेतामध्ये ’मटरु की बिजली का मंडोला’चे चित्रीकरण सूरू असताना सेटवर कुणीही धूम्रपान करणार नाही, अशी त्याने आपल्या टीमला सक्त ताकीद दिली.तसेच त्याने चहापाण्याचे ग्लासदेखील शेतात फेकण्यास मनाई केली होती. या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याने काही लोकांकडे जबाबदारी दिली होती. शेतात कचरा दिसला तर त्यांना पाणी पिण्यासाठी तीन किलोमीटर दूर जावे लागेल, असाही विनोद त्यावेळी केला गेला होता

नेहमीच वेगळ्या घाटणीचे चित्रपत देणार्‍या विशालकडून वेगळ्या कॉमेडीची अपेक्षा आहे.अनुष्का शर्मा, इमरान खान, शबाना आझमी, आर्य बब्बर आणि पंकज कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत. बिजली आणि बादलचे लग्न होणार का ? या सगळ्यांच्या आयुष्यात नेमके काय घडते ? या आणि अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी बघायला हवा उत्तरे आपल्याला ‘मटरु की बिजली का मंडोला’.

Leave a Comment