कोरिया बॅडमिंटन स्पर्धेतील सायनाचे आव्हान संपुष्टात

सेउल, दि.११ – सेउल येथे सुरु असलेल्या कोरिया सुपर सिरीज प्रिमिअर बॅडमिटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताची स्पर्धेतील एकमात्र स्पर्धक असलेल्या सायना नेहवालला शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

चुरशीच्या झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या ली हॅनने सायनाचा १४-२१, २१-१५, १२-२१ असा पराभव करीत उपांत्यफेरीत धडक मारली. यापूर्वी पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यप आणि महिला एकेरीतच पी.व्ही.सिधु यांचे आव्हान संपुष्टात झाले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा या सायनाच्या कामगिरीवर होत्या. मात्र, ती उपांत्यफेरी गाठण्यात अपयशी ठरली. सामन्यात सायनाने पहिला गेम १४-२१ असा गमावला. दुसर्यात गेममध्ये मात्र आपला खेळ उंचावत सायनाने हा गेम २१-१५ असा जिंकला. सामन्यात चांगलीच चुरस निर्माण झाली होती. पण,तिसर्याे गेममध्ये चीनच्या ली हॅनने सायनाला कोणतीच संधी न देता हा गेम १२-२१ असा जिंकत सामन्यात विजयाची नोंद केली.

Leave a Comment