शमी अहमदच्या खेळीने सर्वजण प्रभावित

पहिल्याच वन डे सामन्यात चार निर्धाव षटके टाकून नवा विक्रम नोंदवणा-या शमी अहमदच्या खेळीने सर्वजण प्रभावित झाले आहेत. यापूर्वी त्याने बंगालकडून रणजी ट्रॉफी आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून आयपीएलचे सामने खेळले आहेत. पाकविरुद्ध सामन्यात चांगली गोलंदाजी करत शमीने भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याबद्दल शमीचे उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे जोरात स्वागत करण्यात आले.

पाकविरुद्ध सामन्यात चार निर्धाव षटके टाकून नवा विक्रम नोंदवणा-या शमीला इंग्लंडविरुद्ध मालिकेत खेळण्याची संधी मिळाली आहे. ११ जानेवारीपासून मालिकेला प्रारंभ होणार आहे. सध्या टीम इंडियाकडे वेगवान गोलंदाजाची कमतरता आहे. त्याची उणीव शमी अहमदने भरून काढली आहे. त्याने पहिल्याच सामन्यात प्रभावी कामगिरी करून पाकविरुद्ध नवा विक्रम केला. या सामन्यात चार निर्धाव षटके टाकणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्यामुळे त्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

पाकविरुद्धचा सामना जिंकून आल्यानंतर शमी अहमदचे उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे भव्य स्वागत केले. सोमवारी सकाळी त्याचे सहसपूर येथे आगमन झाले. त्याच्या स्वागतासाठी गावातील रस्ते सजवण्यात आले होते.

Leave a Comment