नेल्सन मंडेलांची प्रकृती सुधारली

दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्याे डॉक्टरांनी सांगितले. ९४ वर्षीय मंडेला यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता आणि त्यांच्या पित्ताशयात खडे झाले होते. त्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. नाताळनंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला गेल्यानंतर ते जोहान्सबर्ग येथील आपल्या घरात विश्रांती घेत आहेत.

मंडेलांवर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले की मंडेला यांची प्रकृती आता चांगली असून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. २७ वर्षांच्या कैदेतून १९९० साली मुक्तता झाल्यानंतर मंडेला प्रथमच उपचारांसाठी तीन आठवडे रूग्णालयात दाखल झाले होते. ते आपले दैनंदिन व्यवहार लवकरच सुरू करतील.
 
मंडेलांचा नातू मॅडदा मंडेला म्हणाले की नेल्सन मंडेला हा देशात लोकशाही यावी यासाठी दीर्घ काळ आंदोलन करून देश ढवळून काढणारे व देशाच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले पहिले ब्लॅक प्रेसिडेंट आहेत. ते आता आजारातून चांगले बरे झाले आहेत आणि पूर्वीपेक्षा ते अधिक स्ट्राँगही वाटत आहेत. आफ्रेकेचे अध्यक्ष झुमा यांनीही मंडेला यांना शुभेच्छा दिल्या असून देशाच्या सर्व नागरिकांच्या सद्भावना तुमच्या बरोबर आहेत असा संदेश दिला आहे. देशातील नागरिक तुमच्यावर नेहमीच प्रेम करतील आणि तुम्हाला आमचा सदैव पाठिबा आहे असेही त्यांनी या संदेशात नमूद केले आहे.

Leave a Comment